पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजवाड्यातील उभारणीसाठी फेब्रुवारी १८९० मध्ये खानगी अधिकारीपदी पेस्तनजी दोराबजी यांची नियुक्ती झाली. राजवाड्यातील पाश्चात्य पद्धतीचे फर्निचर, ड्रेसिगं रूम, बाथरूम, डायनिंग टे बल, विजेचे दिवे, वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी या सर्व बाबी पेस्तनजींनी स्वत:च्या कारकीर्दीत अतिशय उत्तम पद्धतीने उभ्या के ल्या. बांधकाम पूर्ण झाल्यावर लक्ष्मीविलास राजवाड्यातील फर्निचर तयार करण्याची सर्वात महत्त्वाची कामगिरी पेस्तनजी यांनीच पार पाडली.
 लक्ष्मीविलास पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये सगं ीत मैफिली आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन के ले जात होते. हॉलच्या पहिल्या मजल्यावर तीन बाजूंच्या गॅलरी स्त्रियांसाठी राखीव ठे वण्यात आल्या. या गॅलरीमध्ये बसनू राजघराण्यातील स्त्रियांनी झरोक्यातून दरबार हॉलमधील कार्यक्रम बघण्याची सोय होती. सयाजीरावांच्या विवाहानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी महाराणी चिमणाबाई (पहिल्या) यांच्यासोबत तंजावरमधील भरतनाट्यमच्या कलावंतांचा ताफा बडोद्यात आला होता. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये या कलावंतांचा कार्यक्रम अनेकदा आयोजित करण्यात आला होता.

राजवाड्यातील सजावट

 राजा रवी वर्मा हे के रळमधील महान चित्रकार होते. बडोद्याचे

दिवाण सर टी. माधवराव यांनी त्यांना बडोद्यात आणले.त्यावेळी लक्ष्मीविलास राजवाड्याचे बांधकामही सपंत आले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / 10