पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या संस्थेत तीनही बँकांनी समान गुंतवणूक केली होती. १९९९ मध्ये बडोदा बँकेने इतर दोन संस्थांचे भाग विकत घेऊन या संस्थेचा संपूर्ण ताबा मिळवला. १९९३ मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अॅण्ड सिंध बँकेच्या लंडन येथील शाखा asोदा बँकेत विलीन करण्यात आल्या. १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे बँक ऑफ बडोदाची शाखा स्थापन करण्यात आली.
 १९९८ मध्ये बँक ऑफ बडोदाने BoBGLOBAL ही व्हिसाशी संलग्न असलेली आंतरराष्ट्रीय वापरासाठीची क्रेडिट कार्ड सुविधा सुरू केली. हे अशा प्रकारचे भारतातील पहिले क्रेडिट कार्ड होते. हे क्रेडिट कार्ड ६० देशांतील १ कोटीहून अधिक आस्थापनांमध्ये वापरता येते. २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेतीलच बोट्सवना या देशात बडोदा बँकेच्या शाखा सुरू करण्यात आली. बोट्सवनामधील गबोरोन येथे दोन आणि फ्रान्सिस्टाउनमध्ये एक अशी एकूण ३ कार्यालये सुरू करण्यात आली. २००२ मध्ये युगांडा सेक्युरिटी एक्स्चेंज या युगांडा देशाच्या स्टॉक मार्केटमधील व्यापारी कंपनी म्हणून बँक ऑफ बडोदाची नोंदणी करण्यात आली. जुलै २०१४ मध्ये युगांडाच्या स्टॉक मार्केटमध्ये १६ कंपन्या व्यापार करत होत्या.
 २००४मध्ये मलेशियामधील कुआलालुम्पूर आणि चीनमधील गुआंगडोंग येथे बडोदा बँकेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. २० देशांत कार्यरत १९०० हून अधिक शाखांमधील व्यवहार

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३९