Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धोरणाशी आपले नाते किती भक्कमपणे टिकवून आहे हेच यावरून कळते.
 तर २०१९-२० या आर्थिक वर्षात बँक ऑफ बडोदाने सी.एस. आर. अंतर्गत शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी ४ कोटी रु., आरोग्यविषयक सुविधांवर ७९ लाख रु. आणि सामाजिक आर्थिक विकासासाठीच्या उपक्रमांवर ६४ लाख रु. अशी एकूण ५ कोटी ४७ लाख रु. इतकी रक्कम खर्च केली.
आंतरराष्ट्रीय 'झेप'
 'भारताची आंतरराष्ट्रीय बँक' अशी टॅगलाईन असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने १९५३ मध्ये केनियातील मोम्बासा (Mombasa) येथे आपली पहिली आंतरराष्ट्रीय शाखा स्थापन केली. याच वर्षी युगांडा देशातील कंपाला (Kampala) येथे बडोदा बँकेची शाखा सुरू करण्यात आली. १९५३ मध्ये आंतरराष्ट्रीय शाखा सुरू करणारी ही तत्कालीन एकमेव भारतीय बँक असावी. १९५४ मध्ये नैरोबी येथे बँक ऑफ बडोदाची केनियातील दुसरी शाखा सुरू करण्यात आली. १९५५ मध्ये केनियातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांसाठी बँक ऑफ बडोदाने लंडनमध्ये एक शाखा सुरू केली. १९५७ मध्ये बँकिंग क्षेत्राचे आंतरराष्ट्रीय केंद्र असणाऱ्या लंडनमध्ये आपली शाखा सुरू करून बडोदा बँकेने महत्त्ववपूर्ण टप्पा गाठला.
 १९६१ मध्ये फिजी येथे तर १९६२ मध्ये मॉरिशस येथे बडोदा बँकेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. १९६५ मध्ये दक्षिण

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३७