पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या थिओडोर ग्रेगरी यांची भारत सरकारच्या आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. एकाही प्रांतातील तत्कालीन काँग्रेस सरकारने याची योग्य दखल घेऊन अनुकरण केले नाही.
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूं नी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना प्रोत्साहन देत भारताच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिल्याचे आपण जाणतोच. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूं च्या कारकिर्दीतील आर्थिक सल्लागारांसदं र्भात आनंद चंदावरकर लिहितात, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ग्यान चंद यांची भारताचे पहिले आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु ही नियुक्ती जास्त काळ टिकली नाही. नेहरूं नी के वळ आपला सल्लाच नव्हे तर आपल्या उपस्थितीकडेही दुर्लक्ष के ल्याचे लक्षात आल्यानंतर स्वाभिमानी ग्यान चंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक ग्यान चंद यांचा पंडित नेहरूं शी कोणत्याही प्रकारचा वैचारिक मतभेद नव्हता. या पार्श्वभूमीवर सयाजीरावांसारख्या सरंजामशाही व्यवस्थेतील राजाने आर्थिक सल्लागारांचा उपयोग अति-आधुनिकतावादी मानले गेलेले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापेक्षा अधिक धोरणीपणाने आणि मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे के ल्याचे स्पष्टपणे दिसते. आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजून घेऊन योग्य वेळी पाठिंबा दिल्याशिवाय कोणताही राज्यकर्ता यशस्वी होऊ शकत नाही. व्हाईटनॅक आणि सयाजीराव

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / 17