पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतात मानदंड म्हणूनच विचारात घ्यावे लागतात एवढे पायाभूत काम महाराजांनी आपल्या ५८ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत केले. प्राच्यविद्येसारख्या क्षेत्रात महाराजांनी केलेल्या कामाचे भारतातील इतर प्राच्यविद्या संस्थांच्या कामाशी तुलना करून काढलेले वरील निष्कर्ष विचारात घेता बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने महाराजा सयाजीरावांच्या नेतृत्वाखाली केलेले काम किती 'मूलभूत होते याची प्रचिती येते. अगदी आजची भारतातील अग्रगण्य भांडारकर इन्स्टिट्यूट जरी विचारात घेतली तरी बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही भारतातील सर्वात प्रयोगशील, सर्वसमावेशक आणि रचनात्मक काम करणारी सर्वोत्तम संस्था असल्याचा सिद्धांत प्रस्थापित होतो.

●●●
महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३५