पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संस्था ही भारतातील पहिली प्राच्यविद्या संस्था आहे.
 ८) बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेतील हस्तलिखिते संशोधकांना मुक्तपणे उपलब्ध होती. बडोद्यापाठोपाठ स्थापन झालेल्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्था आणि कलकत्ता येथील संस्कृत साहित्य परिषद या संस्थांनी स्वतः समोरील बडोद्याच्या या आदर्शाचे अनुकरण करत आपल्या संग्रहातील हस्तलिखिते संशोधकांना उपलब्ध करून दिली.
 ९) संशोधक व वाचकांना हस्तलिखितांच्या फोटोप्रती मोफत उपलब्ध करून देणारी आधुनिक भारतातील आजअखेरची एकमेव प्राच्यविद्या संस्था ठरते.
 १०) ज्याला आज आपण झेरॉक्स म्हणतो ते फोटोप्रतीचे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने वापरात आणले.
 ११) १७८४ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटी या जगप्रसिद्ध संस्थेचे सदस्यत्व सुरुवातीच्या काळात युरोपियन लोकांपुरते मर्यादित होते. या संस्थेने स्थापनेनंतर ३५ वर्षांनी १८२९ पासून भारतीयांना सदस्यत्व देण्यास सुरुवात केली.
 १२) याउलट बडोदा प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेपासून संशोधक व वाचकांना मुक्त प्रवेश दिला जात होता.

 सयाजीरावांनी आपल्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम या धोरणाला अनुसरून प्रत्येक क्षेत्रात जे मानदंड निर्माण केले ते आजही

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३४