पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नियमित प्रकाशन करणे. ६) 'द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ओरिएन्टल सिरिज'मध्ये लघु पुस्तकांचे प्रकाशन करणे. ७) विविध ग्रंथ मालांमध्ये दुर्मिळ पुस्तकांचे प्रकाशन करणे.
 १९४९ मध्ये जेव्हा महाराजा सयाजीराव विद्यापीठाशी बडोदा प्राच्यविद्या संस्था संलग्न झाली त्यावर्षीपासूनच रामायणाच्या संपादित आवृत्यांच्या प्रकाशनाच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. १९५० ते १९७५ या एकूण २५ वर्षे या संपादनाचे काम सुरू होते. यासाठी जगभरातील २,००० पांडव लिपींचा संग्रह करण्यात आला. या प्रकल्पामुळे संपूर्ण महाराजा सयाजीराव विद्यापीठाला जागतिक मान्यता मिळाली. यातील 'द बालाकांड' हा पहिला खंड १९६० मध्ये प्रकाशित झाला. दुसरा खंड 'द अयोध्याकांड' हा १९६२ मध्ये 'द अरण्यकांड' हा तिसरा खंड १९६३ मध्ये 'द किष्किन्धाकांड' हा चौथा खंड १९६५ मध्ये ‘द सुंदराकांड' हा पाचवा खंड १९६६ मध्ये 'द युद्धकांड' हा सहावा खंड १९७१ मध्ये आणि सातवा आणि अखेरचा खंड ‘उत्तराकांड' हा १९७५ मध्ये प्रकाशित झाला.

 कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट गोल्डमन यांनी बडोदा विद्यापीठाने काढलेल्या रामायणाच्या या संपादित आवृत्यांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. सुकन्या आगाशे यांनी The Search for Ravanas Lanka - The Geography of Valmiki Ramayana या संशोधन ग्रंथाचा मूळ आधार म्हणून

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३०