पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजांनी महाभारतावरील संशोधनासाठी ५,५०० रुपये दिले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत एकूण १८,५०० रुपये आर्थिक साहाय्य केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४ कोटी ५८ लाख ६२ हजार रुपये इतकी होते. परंतु संस्थेच्या उभारणीत पायाभूत योगदान असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत संस्थेचे आश्रयदाते म्हणून सयाजीरावांचा फोटोसुद्धा आपल्याला आढळत नाही याचे नवल वाटते.
प्राच्यविद्या संस्था महाराजा सयाजीराव विद्यापीठाशी संलग्न

 १९४९ मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठाची स्थापना झाली. याच वर्षी प्राच्यविद्या संस्था महाराजा सयाजीराव विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली. त्यानंतर या संस्थेचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले. १) अमूल्य आणि दुर्मिळ अशा ३० हजार हस्तलिखित पोथ्यांचे संवर्धन, अभिवृत्ती व सूचीकरण करणे. २) या हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करणे. या हस्तलिखितांचे तज्ञांकडून संशोधन व संपादन करून गायकवाड ओरिएन्टल सिरिजमध्ये प्रकाशित करणे. ४) रामायण व पुराणांच्या संशोधित आवृत्या प्रकाशित करणे. ५) जर्नल ऑफ ओरिएन्टल इंस्ट्यूिट (इंग्रजी) व स्वाध्याय (गुजराथी) यांचे

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २९