पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
सर्वधर्मपरिषद

 पहिली जागतिक सर्वधर्मपरिषद ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केली होती. या परिषदेत स्वामी विवेकानंदांनी 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो' अशी भाषणाची केलेली सरुवात आणि त्यानंतर उपस्थित सात हजार जनसमुदायाने दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेची शिकवण देणाऱ्या प्राचीन देशाचे प्रतिनिधित्व विवेकानंदांनी केले. विश्वातील प्राचीन हिंदू धर्माचे महत्त्व विशद करताना वेद आणि भारतातील संस्कृतीवर विशेष भर दिला. यावेळी विवेकानंदांनी जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व 'एकच ' असल्याचे प्रतिपादन खासकरून केले. अल्पशा भाषणात उपस्थितांची मने जिंकली. हा सर्व घटनाक्रम भारतात नव्हे; तर भारताबाहेरही सुप्रसिद्ध आहे.

 पण त्यानंतर दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद कधी- कोठे आयोजित केली? या परिषदेला भारतीयांचे प्रतिनिधित्व कोणी केले? भारतीयांतर्फे भाषण कोणी आणि कसे केले? याबद्दल

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / ६