Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जनसमुदाय या प्रश्नाला समाधानकारक उत्तर शोधू शकला नाही. यावर कोणत्याही धर्माने मार्ग काढला तर तो धर्म, देश, प्रांत मानवमुक्तीचा आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही.
 धर्म कसा असावा? या प्रश्नांचे उत्तर देताना महाराजांनी मोठे मार्मिक आणि अभ्यासू विधान केले. 'आपल्यामध्ये चळवळ असावी; पण जबरदस्ती नसावी, आपण पिकवावे, पण त्यावर मालकी हक्क गाजवू नये, इतरांना आपण मार्ग दाखवावा, पण त्याच्या नाकात वेसन घालू नये.' त्यांची धर्माबाबत असणारी भूमिका इतकी सरळ, साधी आणि स्पष्ट होती. अमेरिकेतील तत्कालीन The Boston Globe, Chicago Tribune, The Windsor Star, The South Bend Tribune, The Minneapolis Star, The Eagle या महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी महाराजांचे आगमन, २१ तोफांची सलामी, सर्वधर्मपरिषदेचे आयोजन आणि अध्यक्षीय भाषण यावर सविस्तर वृत्त आणि लेख प्रकाशित केले. हे मूळ इंग्रजी भाषण आणि मराठी अनुवाद महाराष्ट्र शासनाच्या 'महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती' ने प्रकाशित केला आहे. हे मुळातून वाचणे इष्ट ठरेल.

 तत्कालीन कर्त्या लोकांमध्ये एकापेक्षा एक धर्म अभ्यासक भारतात -विदेशात होते; परंतु या सर्वांपेक्षा सयाजीरावांचे विचार आणि कार्य अनोखे होते. त्यांचा सर्वधर्मांचा अभ्यास तर होताच, त्याचबरोबर काळानुसार धर्मातील चांगल्या-वाईट बाबी

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २६