पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रज्ञावंत आणि प्रगल्भ विचारांचे तत्त्वज्ञानी राजा असल्यामुळे त्यांची पुढील परिषदांच्या अध्यक्षपदी आणि उद्घाटक म्हणून निवड झाली. यामध्ये अ. भा. सामाजिक परिषद (१९१०), अ.भा. कॉंग्रेस अधिवेशनातील औद्योगिक प्रदर्शन (१९०६), महाराष्ट्र साहित्य परिषद (१९०६), अ. भा. मराठा शिक्षण परिषद (१९१०), अ.भा. आर्यसमाजाची परिषद, (१९११), अ.भा. संस्कृत परिषद (१९१५), अ.भा. संगीत परिषद (१९९६), अ. भा. मराठी साहित्य संमेलन (१९२१), जागतिक प्राच्यविद्या परिषद - सातवे (१९३३) पहिली जागतिक मानववंश परिषद, लंडन (१९११), अ.भा. अस्पृश्यता निवारण परिषद (१९१८), अ.भा. तत्त्वज्ञान परिषद (१९२७), अ.भा. मराठी साहित्य संमेलन (१९३२), पहिली जागतिक शांतता परिषद (१९३३), अ.भा. हिंदी साहित्य संमेलन (१९३४) अशा पंचवीस पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचा समावेश होतो.

 सयाजीराव महाराजांची कोणतीही सुधारणा भरीव पायावर उभा असे. त्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या असे. परिणामस्वरूप, शाश्वत फलनिष्पत्ती होत असे. जाती-पंथ- सामाजिक आणि धर्मसुधारणा या केवळ व्याख्यानाने आणि हुकूम करून होत नाहीत याची महाराजांना कल्पना होती. त्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि आचरण महत्त्वाचे असते. कोणताही बदल दीर्घकाळ टिकायचा असेल तर त्यासाठी अनेक पिढ्यांना सुशिक्षण दिले पाहिजे या हेतूने लिखित स्वरूपाची सामग्री

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २२