पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘या कामाचे सांस्कृतिक महत्त्व विचारात घेऊन विद्वानांनी हा ग्रंथ पुनर्प्रकाशनासाठी निवडला आहे.' परंतु महाराष्ट्राच्या या भूमिपुत्राच्या 'अचाट कर्तृत्वाची ओळख महाराष्ट्रातील 'मावळ्यांना' नाही यातच आपल्या 'पराभूत मानसिकतेचे ‘रहस्य’ लपले आहे. म्हणूनच पुन्हा एकदा राखेतून उठणाऱ्या 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे 'गगनझेप' घेण्यासाठी या ग्रंथाची पारायणे महाराष्ट्रातील घराघरात होणे गरजेचे आहे.

 १५२ पानांच्या या ग्रंथाची डिजिटल कॉपी बाबा भांड यांना सेन्ट्रल लायब्ररी, अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वेबसाईटवर २०१० साली मिळाली. या ग्रंथाचे २०१६ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे बाबा भांड यांनी औरंगाबादच्या 'वाल्मी' या दुष्काळावर काम करणाऱ्या संस्थेचे निवृत्त सहसंचालक डॉ. एस. बी. व्हराडे यांच्या प्रस्तावनेसह संस्थेचे पहिले प्रकाशन म्हणून या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन केले. बाबा भांड यांच्या २०१२ मध 'युगदृष्टा सयाजीराव' या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित कादंबरीमध्ये महाराजांच्या 'Notes on the Famine Tour' या ग्रंथाचे अनेक संदर्भ आढळतात. नुकतेच दिलीप चव्हाण यांनी याचे मराठी भाषांतर 'दुष्काळी दौऱ्याच्या नोंदी' या नावाने महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव चरित्र साधने प्रकाशन समितीसाठी केले.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / ९