पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते इ.स. १९११ ला वेगळे झाले. यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. 'ख्रिस्ताचे जीवन') हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १७