पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचा टप्पा होता. फिल्म तयार झाल्यावर त्या फिल्मचा उपयोग करून घेता येईल, असा कॅमेरा ब्रिटिश संशोधक विल्यम फ्रिजग्रीन याने त्याचवर्षी बनविला. चलतचित्रण आणि चित्रप्रक्षेपण यात बरीच प्रगती झाली. म्हणून विल्यम फ्रिजग्रीनला चित्रपटकलेचा जनक मानतात. प्राचार्य गज्जरानी कलाभवनाचा फोटो स्टुडिओ व रसायन शाळा फाळकेंच्या ताब्यात दिली आणि नवनवीन प्रयोग करण्यास फाळकेंना शक्य झाले. वेळेचे बंधन नसल्याने फाळकेंनी कलाभवनाच्या स्टुडिओत बरेच दिवस निरनिराळे प्रयोग केले. हा त्यांचा पहिला चित्रपट काढण्याच्या महान कार्याचा महत्त्वाचा टप्पा मानला गेला.
'राजा हरिश्चंद्र' भारतीय पहिला चित्रपट

 दादासाहेबांनी इ.स. १९०३ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पत्करली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली; पण स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि चळवळीला साथ देत त्यांनी ही सरकारी नोकरी तीन वर्षात सोडून दिली. इ.स. १९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला 'फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)' ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. तिचे रूपांतर 'लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स' मध्ये झाले. इ.स. १९०९ मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १६