पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण महाराजांच्या १८८७ पासनू ते १९३८ पर्यंतच्या या २६ जगप्रवासाचा विचार करतो तेव्हा या जगप्रवासांचे अहवाल हा भारतातील प्रवासलेखनाच्या इतिहासातील अशा प्रकारचा बहुधा एकमेव लेखन प्रकार म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो.

सयाजीरावांचा जगप्रवास : एक वेगळे पण
 महाराजा सयाजीराव हे वयाच्या १२ व्या वर्षी १८७५ मध्ये बडोद्याच्या गादीला दत्तक आले. त्यांचे जन्मगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कवळाणे हे होते. दत्तक जाईपर्यंत ते निरक्षर होते. एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात ज्याप्रकारचे वातावरण असते त्या वातावरणातून थेट राजा होणे हा जसा त्यांच्या जीवनातील ‘टर्निंग पॉइटं ’ होता तसाच प्रचंड मानसशास्त्रीय दबाव निर्माण करणारा टप्पाही होता. १८७५ ते १८८१ या ६ वर्षात त्यांना अक्षरओळख, विविध विषयांचे प्राथमिक ज्ञान आणि राज्यकारभाराचे धडे दिले गेले. १८८१ ला त्यांना राज्याधिकार प्राप्त झाले आणि त्यांचा स्वतंत्र कारभार सरुु झाला. राज्यकारभार हाती आल्यापासनू ते आपण कोठे ही कमी पडता कामा नये या टोकदार धारणेने काम करत होते. त्यांना मिळालेले शिक्षण फारच तोकडे आहे आणि त्यांना पार पाडायची जबाबदारी मोठी आहे ही जाणीव त्यांच्या राज्यकारभाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या व्यक्तिमत्वावर ताबा ठेऊन होती.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / 8