पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 परंतु अशा लेखनामध्ये परदेशाचे आपल्या देशाशी तुलना करून केलेले चिंतन अपवादानेच आढळते. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील राज्यकर्त्यांचा परदेश प्रवास विचारात घेतला तर एक बाब प्रकर्षाने जाणवते ती अशी की भारतीय राज्यकर्त्यांनी केलेले परदेश प्रवास तुलनेने कमी आहेत. त्यातही एखाद्या शासनकर्त्याने भरपूर परदेश प्रवास केला असेल तर त्या प्रवासाच्या नोंदी, अहवाल किंवा स्वतंत्र लेखन अतिशय नगण्य आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या २६ जगप्रवासाचे अहवाल महाराजांच्या शिस्तबद्ध दस्ताऐवजीकरणामुळे आज उपलब्ध आहेत. हे अहवाल इतिहासाची प्राथमिक साधने म्हणून मौलिक ठेवा आहेत. महाराजांनी ते छापून घेतले होते. एकतर महाराजांएवढा जगप्रवास आणि तोही अभ्यासू वृत्तीने एखाद्या प्रशासकाने केल्याचे दुसरे उदाहरण सापडत नाही. पंडित राहुल सांस्कृतायन यांच्यासारखा बौद्ध विद्वान हा भारतीय प्रवासलेखनातील अपवाद ठरेल. कारण भारतातील प्रवासलेखनाचा आढावा घेता राहुल संस्कृतायन यांनी प्रचंडसां प्रवास करून एकूण १९२६ ते १९६० या ३४ वर्षात २२ प्रवास लेखने लिहिली. या सर्व लेखनात त्यांचा भारतातील आणि भारताबाहेरील प्रवास ग्रंथबद्ध झाला आहे.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७