पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपण सयाजीरावांच्या जगप्रवासाला आपला 'वाटाड्या' केले असता तर कलामसाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नाला गवसणी घालण्याचे बळ आपल्या पंखाना मिळाले असते. हेच सयाजीरावांचे बलस्थान आहे. सयाजीराव हे भारतासाठी कायमच 'समकालीन आदर्श' ठरणार आहेत. त्यामुळे पुढची अनेक दशके सयाजीरावांच्या पुनर्वाचनाची नितांत गरज असेल. याचे कारण त्यांचे द्रष्टे नेतृत्व हे जसे आहे तसे किंवा त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्यांची अखंड आणि प्रचंड ज्ञानसाधना हेसुद्धा आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या उन्नतीसाठी सयाजीरावांच्या जगप्रवासाच्या अहवालांचे 'पारायण' सातत्याने करावे लागेल.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७७