पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे पॅरिसमधील कायदेपंडित सॉलिसिटर यांची भेट घेतली. महाराजांनी १ मे ला पॅरिस विद्यापीठातील थोर पौर्वात्य अभ्यासक प्रा. सिल्व्हीन लेव्ही यांची भेट घेतली. प्रा. लेव्ही यांना प्राचीन संस्कृत साहित्य आणि वैदिक काळातील भारतीय संस्कृतीच्या संशोधनविषयक कार्य व भारतीय विद्यार्थ्यांमध्ये खूपच रस होता. यावेळी महाराजांनी 'इन्स्टिट्यूट द ला सिव्हिलिझासियाँ इंदियन'ला २,००० पौंडांची देणगी दिली.

 या रकमेच्या व्याजातून भारतीय संस्कृती व जीवनपद्धतीशी संबंधित कोणत्याही विषयावर अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. फ्रांस, हॉलंड, जर्मनी आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये सात वर्षांचा अनुभव असलेले शेतीतज्ञ डॉ. लिखिते यांना महाराजांनी बडोद्याच्या सेवेत रुजू करून घेतले. बडोदा संस्थानातील ज्या शाळा व शैक्षणिक संस्थांवर खूप निधी खर्च करूनही लोक त्यांचा पुरेसा फायदा घेत नाहीत, त्या संस्थांवर निधी खर्च करण्याच्या धोरणाला महाराजांचा विरोध होता. त्यामुळे पॅरिसमध्ये असताना महाराजांनी शिक्षण विभागाला त्यावेळी अस्तित्वात असलेल्या धोरणाचा व्यापक आढावा घेण्याविषयी तपशीलवार सूचना देवून, जे काही दोष आहेत त्यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याचा आदेश दिला.

 सयाजीरावांनी इंग्लंडमध्ये स्काऊटसंदर्भातील महत्वाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी बडोदा संस्थानने श्री. दवे यांच्या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६१