पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेरावा प्रवास : १९२१
 महाराज २४ मार्च १९२१ ला इंग्लंडला जाण्यासाठी बडोद्यातून निघाले. लौसन्ने येथील पॅलेस हॉटेलमध्ये ३३ दिवस महाराजांनी मुक्काम केला. पुढे विची येथे असणारे हॉटेल डू पार्कमध्ये महाराज ३० दिवस राहिले. ऑक्टोबर महिन्यात महाराजांनी पॅरिस येथे २७ दिवस वास्तव्य केले. सयाजीराव ७ महीने २१ दिवसांच्या या प्रवासावरून १३ नोव्हेंबर १९२१ ला बडोद्यास परतले.

चौदावा प्रवास : १९२२
 महाराजांचा चौदावा युरोप दौरा १ एप्रिल १९२२ ते २५ नोव्हेंबर १९२३ असा १९ महीने २५ दिवसांचा होता. सयाजीराव परदेशात पोहोचल्यानंतर सुरुवातीला पॅरिसमध्येच १५ एप्रिल ते १७ मे असे ३२ दिवस राहिले. तर लंडनमध्ये सयाजीरावांचे ३० दिवस वास्तव्य होते. पुढे १९२३ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात ६० दिवस महाराजांचा मुक्काम पॅरिसमध्ये होता. सयाजीरावांनी स्वित्झर्लंडमध्ये ३३ दिवस व्यतीत केले. ९ नोव्हेंबर १९२३ ला महाराज भारतात परतण्यासाठी पॅरिसहून निघाले.

पंधरावा प्रवास : १९२४

 संधीवाताने त्रस्त सयाजीराव उपचार व हवा बदलासाठी २६ एप्रिल १९२४ ला मुंबईतून युरोपला जाण्यासाठी निघाले. पॅरिसमध्ये डॉ. विदाल आणि डॉ. वॅक्यूज यांनी महाराजांची

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५३