पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल रेड्स यांच्याशी ओळख झाली. मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या लॉर्ड रिये यांची स्कॉटलँड येथे भेट घेतली.

 महाराजांनी ईस्टबोर्न येथील कु. एफ. एम. वेस्ट यांच्या शाळेला भेट दिली. या शाळेत श्री. रूजे यांच्याकडे किसनराव गायकवाड यांचे चिरंजीव गणपतराव गायकवाड यांना शिक्षणासाठी ठेवले होते. महाराजांनी केंबरले येथील दोन युद्धकैद्यांच्या छावण्यांना भेट दिली. त्यावेळी सयाजीरावांनी छावणी कमांडरकडे काही रक्कम देऊन ज्या कैद्यांना पैशांची अधिक गरज आहे त्यांच्यासाठी वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली. २१ ऑक्टोबर १९१४ ला महाराजांनी बकिंगहॅम राजवाड्यात ब्रिटनच्या सम्राटांची भेट घेतली. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेला सयाजीरावांनी भेट दिली. त्यावेळी महाराजांना या संस्थेचे आजीवन सदस्यत्व प्रदान करण्यात आले. या दौऱ्यावेळी महाराजांनी बडोद्यातील पांढरे, पुणेकर, गणपतराव व अवचितराव यांचे चिरंजीव अशा चार विद्यार्थ्यांना लंडनला शिकण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला.

बारावा प्रवास : १९१९

 अकराव्या जगप्रवासानंतर महाराज ५ वर्षे ३ महिने भारतात होते. जून - जुलै १९९९ दरम्यान महाराज काश्मीरमध्ये होते. यावेळी महाराजांना संधीवाताचा खूप त्रास झाला. यावर उपचार करण्यासाठी महाराजांना युरोपला जाण्याचे डॉक्टरांनी

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५१