पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व भाषण केले. २२ सप्टेंबरला उत्तर स्कॉटलंडमधील इनव्हरनेस येथील वार्षिक क्रीडा महोत्सवास सयाजीरावांनी भेट दिली.

दहावा प्रवास : १९१३
 हा इंग्लंड दौरा ३ मे १९९३ ते ७ नोव्हेंबर १९१३ असा ६ महिने ४ दिवसांचा होता. फेब्रुवारी १९१३ मध्ये महाराजांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना परदेश प्रवासाचा सल्ला दिला. या प्रवासात पॅरिसजवळील एव्हीअन या ठिकाणी महाराजांनी मुक्काम केला. येथे महाराजांनी थोडेफार फ्रेंच शिकून घेतले. निसर्ग संपत्तीने परिपूर्ण अशा या ठिकाणी महाराजांच्या प्रकृतीला चांगला आराम मिळाला. त्यानंतर महाराज जिनिव्हाला गेले. जिनिव्हा विद्यापीठात महाराजांनी वनस्पतीशास्त्राचे प्रा. रॉबर्ट यांच्याशी महाराजांनी चर्चा केली. त्यांच्याकडून महाराजांना वनस्पतीशास्त्र शिकायचे होते. परंतु महाराजांना ते शक्य झाले नाही. येथेच महाराजांनी हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

 या दौऱ्यात महाराजांची परवानगी घेऊन राजकुमारी इंदिरा राजे लंडनला गेल्या आणि राजपुत्र जितेंद्र नारायण बहादूर कुचबिहार यांच्याशी सोमवार, २४ ऑगस्टला ब्रह्मो समाजाच्या रितीने विवाहबद्ध झाल्या. कु. टोटेनहॅम आणि कॅप्टन परब हे राजकुमारीबरोबर होते. त्यांनी विवाहाच्या सर्व बाबी कायदेशीररीत्या पूर्ण झालेल्या पाहावयाच्या होत्या. त्याप्रमाणे सर्व गोष्टी योग्यरित्या पार पडल्या होत्या. इंदिराराजे यांच्या ताब्यात असलेल्या दागिन्यांची यादी तेथील खजिनदारांकडे सोपवण्यात आली होती.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४९