पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुपस्थितीत लॉर्ड कर्झनने १ ऑगस्ट १९०० मध्ये बडोद्याला भेट दिली. शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी महाराजांनी १० लाख रु. मंजूर केले. त्याचप्रमाणे भारतात लघु उद्योग सुरु करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती जमा केली. छगनलाल मोदींना होमरच्या ओडिसी या महाकाव्याचे सोप्या गुजरातीत भाषांतर करण्याचे तसेच देशी शिक्षण विभागातून इंग्रजी शिक्षण विभाग वेगळा काढण्याचे आदेशदेखील दिले.

 महाराजांनी ५ सप्टेंबर १९०० ला काढलेले आदेश पुढीलप्रमाणे
- १. निवडक पिलवाई कागदपत्रे छापून घ्यावीत. २. संस्थानच्या राज्यकारभाराचा ताजा अहवाल छापून घ्यावा. ३. दुष्काळी कामाच्या अहवालाचीपण छपाई करावी. ४. महाराजांनी पदग्रहण केल्यापासूनचा बडोद्याच्या कामकाजाचा इतिहास इंग्रजीत छापून घ्यावा. यात त्यांनी वेळोवेळी सर्व विभागात केलेल्या सुधारणांचा समावेश असावा. ५. संस्थानातील सिंचन प्रकल्पांचा संभाव्य आराखडा तयार ठेवावा. ६. प्रत्येक प्रकल्पाच्या विकासाचा छापील वृत्तांत महाराजांना सादर करावा. ७. मालमत्तेच्या हस्तांतरणाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. ८. कलाभवन युरोपीयन कलावंतांच्या निगराणीत आणि निमंत्रणात द्यावे किंवा कसे याबाबतीत विचार व्हावा.
 महाराजांनी पाठविलेल्या सार्वजनिक आरोग्याविषयी स्मरणपत्रात पुढील बाबींचा समावेश होता. मंत्र्यांनी सॅनिटरी कमिश्नर किंवा आरोग्य शहर सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना
महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४१