पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव


आणि


जलनियोजन


 जगभर वाढलेली लोकसंख्या, कमी होणारे वनक्षेत्र, वाढत्या प्रदूषणाचा निसर्गचक्रावर झालेला परिणाम, कमी पडणारा पाऊस, पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता, अमर्याद वापरामुळे जगभरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. पुढील महायुद्ध पाण्यामुळे होईल हे जलतज्ज्ञांचे मत खरे होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वाटप करणे राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पाण्याची मुबलकता असतानाही भविष्याचा वेध घेत पाण्याचे नियोजन करणारे, शेती आणि प्रत्येक व्यक्तीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणारे एक राजे भारतात होऊन होऊन गेले. ते म्हणजे बडोद्याचे नृपती महाराजा सयाजीराव गायकवाड होय.

 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा राज्यावर चौसष्ट वर्षे राज्यकारभार केला. जगातील मोजक्याच सत्ताधीशांच्या हाती एवढी दीर्घकाळ सत्ता राहिल्याची उदाहरणे

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / ६