पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेच धोरण मनात ठेवून त्यांनी पुण्यातील एक नामवंत वकील आणि ब्राह्णेतर समाजाचे नेते गंगारामभाऊ म्हस्के यांना बहुजन समाजातील पदवीधर आणि नोकरीस पात्र अशा लोकांची नावे कळविण्यास विनंती केली.
 गंगारामभाऊ म्हस्के यांनी १८८३ मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेमार्फत अनेक गरीब आणि होतकरू अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांनी दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठ्ठलराव जाधव या दोन होतकरू तरुणांची नावे शाहू छत्रपतींना कळविली.' पुढे शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची ८ जून १८९५ रोजी असिस्टंट सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानात नेमणूक केली. पुढे २७ वर्ष भास्करराव जाधवांनी कोल्हापूर संस्थानात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांनाही बांधकाम विभागाचे प्रमुख केले. या उदाहरणावरून १८८५ पासून सयाजीरावांनी या संस्थेला दिलेला राजाश्रय महाराष्ट्राला किती उपकारक ठरला हे सूचित होते.
गंगारामभाऊंच्या कामाची ऐतिहासिकता

 गंगारामभाऊ म्हस्के हे नाव महाराष्ट्रातील सामान्य लोकांना माहीतसुद्धा नाही याबद्दल आश्चर्य वाटण्याचा प्रश्नच नाही. कारण इतिहास आणि सामाजिक संशोधकांनासुद्धा 'कोण हे गंगारामभाऊ ?" असा धक्कादायक प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कामाची ऐतिहासिकता शोधणे

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २३