पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अनेक शिक्षण संस्थांचे सूत्रधार हे गंगारामभाऊंच्या दातृत्वाचे लाभार्थी आहेत.आज महाराष्ट्रातील १४५ शिक्षणसंस्था ज्यांच्या नावात शिवाजी किंवा मराठा हे शब्द येतात त्यांचे संस्थापक गंगारामभाऊ आणि सयाजीराव यांच्या शिष्यवृत्तीवर शिकलेले आहेत.त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुजनांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवणे गरजेचे आहे.
सयाजीराव : मराठ्यांचा आधारवड

 समाज उन्नतीसाठीचे सयाजीरावांचे दातृत्व हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. भारताच्याच काय जगाच्या इतिहासात समाजविकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचे सयाजीरावांचे उदाहरण अपवादात्मक ठरावे.सयाजीरावांनी समाजातील सर्व जातीधर्मातील लोकांना त्यांच्या समाज उन्नतीसाठी आर्थिक मदत केली.ही मदत करत असताना त्यांनी कोणाचा जात-धर्म पाहिला नाही. एकूण समाजव्यवस्थेत संबंधित समुदायाचे मागासलेपण पाहून त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार महाराजांनी त्यांना मदत केली.मराठा जातीबाबतही महाराजांचे हेच धोरण होते. स्वजातीचा विकास एवढा कोता विचार महाराजांनी केला नाही.मराठा जातीसाठी काम करणाऱ्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन व अखिल मराठा शिक्षण परिषद या दोन संस्थांना सयाजीरावांनी आर्थिक पाठबळ दिले नसते तर या संस्थांना त्यांनी जे कार्य केले ते एवढे व्यापक

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १५