पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कै. गंगारामभाऊ म्हस्के वकील यांनी मागासलेल्या वर्गात कर्तव्यजागृतीस आरंभ केला. पुणे व मुंबई येथे सत्यशोधक समाज व दीनबंधू, सार्वजनिक सभा अशा संस्था स्थापन करण्यात आल्या. दीनबंधू शेतकऱ्यांचा कैवारी, दीनमित्र, अंबालहरी, बडोदावत्सल वैगेरे पत्रांनी मागासलेल्यांविषयी लेख लिहून शिक्षणविषयक जागृती उत्पन्न केली. मागासलेल्या वर्गामध्ये आपापल्या समाजात शिक्षणप्रसार करण्यासाठी निरनिराळ्या लहान लहान संस्था स्थापन होऊ लागल्या. मागासलेला समाज फार मोठा असल्यामुळे श्रमविभागाच्या तत्त्वावर लहान लहान संस्था असणे अपरिहार्य होते.'

 म्हस्केंचा जन्म हा नाशिक जिल्ह्यातला. म्हणजेच सयाजीराव व म्हस्के हे दोघेही नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र होते. त्यांचे वडील पुण्यात हमालीचे काम करत होते. त्यांचे शिक्षण पुण्यातील मिशन शाळेत झाले. शिक्षण झाल्यावर छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. पुणे कँटोन्मेंट मॅजिस्ट्रेटचे शिरस्तेदार म्हणून त्यांना नोकरी मिळाली. याच दरम्यान त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. १८७५ ला त्यांनी 'पुण्यात वकिली सुरू केली. वकिलीच्या व्यवसायात मोठा लौकिक आणि चांगला पैसा त्यांनी मिळवला. १८७३ मध्ये फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते स्थापनेपासूनच सदस्य आणि हितचिंतक होते. न्यायमूर्ती रानडे आणि गंगारामभाऊ यांची मैत्री होती. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेवेळी रानडे आणि सत्यशोधक राजन्ना

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १०