पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फजिती होण्यास विलंब लागला नसता. तरी एवढे खरे की, यानंतर महाराज सरकारांनी मला आणखी ग्रंथ लिहावयास दिले नाहीत. तरी नाही मला म्हणायला हल्ली सन १९३२ साली मी माझी अकिंचन स्थिती त्यांना कळविली असता एका पुस्तकाचा तरजुमा करिता काय म्हणून विचारले. तो करण्याचे मला सामर्थ्य नाही, असा जबाब मी लिहिला. एकंदरीत तात्पर्य काय की, मी दोन शब्द अविचाराने माझा मित्र समजून एकाला लिहिले. त्यांचा परिणाम हा असा झाला आणि त्याचे एवढे काम केले ते सगळे फुकट गेले.” हा त्यांचा मित्र ब्राह्मण होता. एकूणच केळुसकरांनी मूळ संस्कृतवरून उपनिषदांचे केलेले भाषांतर असे शेवटपर्यंत त्यांना त्रासदायक ठरले. ज्या ज्या ब्राह्मणेतरांनी संस्कृत भाषेला हात घातला त्याला अशा पद्धतीने बहिष्कृत करण्याचा इतिहास मोठा आहे.
मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
 केळुसकर गुरुजींना आयुष्याच्या शेवटच्या आठवड्या योगायोगाने मोठा सन्मान मिळाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने ६ ऑक्टोबर १९३४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केळुसकरांची निवड करण्यात आली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. अ.बा. गजेंद्रगडकर होते. केळुसकर या संमेलनास हजर असले तरी त्यांची प्रकृती क्षीण झाल्यामुळे रा. अ. गोळे यांनी

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४९