पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहा महिन्याचा कालावधी पुरेसा नसल्याने केळुसकरांना आणखी तीन महिन्याची मुदत बडोदे सरकारकडून मागून लागली होती.
मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे भाषांतर करणारे पहिले ब्राह्मणेतर
 मॅक्समुल्लरने स्वतः केलेली बारा उपनिषदांची भाषांतरे 'सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट' या इंग्रजी ग्रंथमालेतील पहिल्या व पंधराव्या अशा दोन ग्रंथांद्वारे प्रसिद्ध केली होती. या इंग्रजी ग्रंथांचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करण्याची सयाजीरावांची इच्छा होती. भाषांतराचे हे काम करण्यासाठी कोणी तयार आहे का हे पाहण्यासाठी जाहिरात देण्याची सूचना सयाजीरावांनी विद्याधिकाऱ्यांना केली. याचवेळी जाहिरात देण्यापूर्वी यापैकी एखादे काम करण्यास केळुसकर तयार आहेत का याची चाचपणीदेखील करण्याची सूचना महाराजांनी केली. त्यानुसार विद्याधिकाऱ्यांनी केळुसकरांना पत्र पाठविले. या पत्राला पाठविलेल्या उत्तरात केळुसकरांनी बारा उपनिषदांचे भाषांतर करण्यास आपण तयार असल्याचे कळविले. तेव्हा सयाजीरावांनी बारा उपनिषदे व व्याससूत्रांवरील शांकरभाष्य यांचे भाषांतर करण्याची जबाबदारी केळुसकरांवर सोपवली.
 मूलत: मॅक्समुल्लरच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधारावर उपनिषदांचे भाषांतर करण्याचा हुकूम सयाजीरावांनी केळुसकरांना दिला होता. केळुसकर मॅक्स मुल्लरचे दोन्ही इंग्रजी ग्रंथ व मूळ

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २४