पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
कर्मवीर भाऊराव पाटील


 महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीच्या इतिहासात फुले- शाहू-आंबेडकरांनंतर महत्त्वाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीरांनी फुलेंच्या स्वप्नातील शिक्षण प्रसाराचे काम अतिशय जिद्दीने पुढे नेले. ज्या गावात एसटी बस जात नव्हती त्या गावापर्यंत कर्मवीरांनी शिक्षण पोहोचविले. त्यामुळेच आज महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होण्यामध्ये कर्मवीर भाऊरावांचा वाटा महत्त्वाचा आहे. कर्मवीर हे स्वतः ला फुलेंचा अनुयायी मानत होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाच्या कामाबरोबर सत्यशोधक चळवळ आणि दलित चळवळीला पूर्ण सहकार्य केले.

 महाराष्ट्रात ज्या अनेक शिक्षण संस्था खेडोपाडी स्थापन झाल्या त्यांनीकर्मवीरांकडून प्रेरणा घेतली होती. सयाजीरावांनी बडोद्यातून महाराष्ट्राच्या शैक्षणिक उन्नतीला पायाभूत आणि सर्वाधिक मदत केली आणि त्यातून बहुजनांच्या शैक्षणिक उन्नतीचा पाया घातला.महाराजांच्या या कामाचा प्रभाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासावर स्पष्टपणे दिसतो. गंगारामभाऊ म्हस्के यांची डेक्कन

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ६