पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांनी समर्पकपणे सांगितले आहे. ते म्हणतात, “Here was an ideal of personality to be imitated by the younger generation of India, Hence his name was given to this first high school started Bhaurao Patil."
 सयाजीरावांनी १८८२ मध्ये सोनगढ येथे सुरू केलेल्या आदिवासी वसतिगृहास १९०० मध्ये ३० एकर जमीन कसण्यासाठी दिली होती. या जमिनीतून भाजीपाला पिकवून वसतिगृहाचे विद्यार्थी तो विकत असत. या प्रयोगाचा दुहेरी हेतू होता. पहिला हेतू आदिवासींना प्रगत शेतीचे शिक्षण देणे आणि दूसरा हेतू असा होता की शिकत असतानाच त्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणे. थोडक्यात संस्थानी खर्चाचे मोफत शिक्षण, राहण्या-खाण्याची सोय केल्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी सयाजीरावांनी भारतात सर्वप्रथम 'कमवा व शिका' योजनेची सुरुवात केली. याच योजनेशी नाते सांगणारी योजना कर्मवीरांनी सयाजीरावांच्या नावाने सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून १९४० मध्ये महाराष्ट्राला दिली.
सयाजीरावांचा प्रभाव

 भाऊरावांनी काढलेले पहिले हॉस्टेल शाहू महाराजांच्या नावाने होते. कारण शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेगवेगळ्या जातींसाठी एकूण ११ वसतिगृहे सुरू केली होती. सयाजीरावांनी asोद्यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २६