पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
उद्योग विकास

 आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासाचा विचार करता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणारा भारत आणि ५६५ संस्थानिकांच्या अधिपत्याखाली असणारा भारत अशा दोन टप्प्यांमध्ये आधुनिक भारतातील औद्योगिक विकासाचा विचार करावा लागतो. ब्रिटिश भारतातील औद्योगिक धोरणाचा प्रभाव त्रावणकोर, हैदराबाद, बडोदा, म्हैसूर यांसारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत संस्थानावर दिसून येतो. या संस्थानांचा तुलनात्मक विचार करता बडोदा संस्थान औद्योगिक विकासाबाबत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे बहुअंगी नेतृत्व होय.

 उद्योगधंद्यांचा विचार करता बडोद्याइतके सर्वकष पायाभूत आणि दीर्घ पल्ल्याचे नियोजन तत्कालीन ब्रिटिश भारतातही झाले नाही. याचे उदाहरण म्हणून दोन बाबींचा विचार करावा लागेल त्यातील पहिली बाब अशी की, उद्योगधंद्यांचा विकास हा दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून असतो. सयाजीरावांनी

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ६