पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अशी बँक स्थापन करणारे बडोदा हे पहिले संस्थान होते. अनेक उद्योग संस्थानाद्वारे सुरू करून नंतर ते खाजगी सक्षम उद्योजकाच्या ताब्यात देऊन उद्योजक तयार करण्याची चळवळ महाराजांनी सुरू केली. उद्योगाचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण होऊ न देता सर्व संस्थानात उद्योगांचे विकेंद्रीकरण करून एक आदर्श निर्माण केला. आज आपल्या देशातील शेती आणि उद्योगांच्या स्थितीतील क्रांतिकारक बदलासाठी उद्योग विकासाचे हे 'सयाजी मॉडेल' पथदर्शक ठरेल.

●●●
महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४९