पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



समकालीन भारतातील 'स्टेट बँक ऑफ इंडिया' च्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून ती नावारूपास आली आहे. बँक ऑफ बडोदाची सद्य:स्थिती सयाजीरावांच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीची साक्ष देते.
उद्योग उभारणीसाठीचे आर्थिक पाठबळ
 सयाजीरावांच्या राज्यारोहणापासून राज्यातील औद्योगिक उपक्रमांना आर्थिक साहाय्य दिले जात होते. हे त्यांच्या शासकीय प्रोत्साहनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. औद्योगिक विकासाच्या इतिहासाच्या सर्व टप्प्यावर आर्थिक मदत देण्याचे सयाजीराव यांचे धोरण उदारमतवादी होते. १९२७ ते १९४१ या कालावधीत ४५ उद्योगांना ६ लाख ३० हजार ५०० रुपयांची कर्जे दिली. यामध्ये १९१४ - १९२० या दरम्यान तीन उद्योगांसाठी यातील २ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज दिले. याचबरोबर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या लघु व कुटिरोद्योगांच्या विकासासाठी २८ हजार रुपयांचे बिनव्याजी अनुदान पुरवले. या सर्व गोष्टी करण्यामागे संस्थानातील जनतेची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी हाच उद्देश होता.

 १९१४-१९२० दरम्यान बडोदा सरकारकडून विविध उद्योगांच्या उभारणीसाठी ८० लाख रुपयांची मदत करण्यात आली. परिणामी १९९१ मध्ये बडोद्यामध्ये असलेली ८६ उद्योगांची संख्या १९२१ मध्ये १२४ वर गेली. कामगारांची संख्या १९११ मध्ये ९४२१ वरून १९२१ साली ११,५९४ पर्यंत

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २६