पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



माध्यमातून करण्यात आले. या मागण्यांचे गिरणी सदस्यांमध्ये वाटप आणि कच्चा माल संदर्भातील समस्या सोडवण्याची जबाबदारी संचालक मंडळावर सोपवण्यात आली.
 १९२६-२७ या वर्षामध्ये बडोद्यातील कापड उद्योग व इतर उद्योगामध्ये प्रत्यक्ष गुंतलेली एकूण कामगार संख्या १५,८३६ इतकी होती. यापैकी १३,१८६ कामगार हे इतर उद्योगामध्ये काम करत होते. तर २,६५० कामगार हे कापड उद्योगामध्ये एकूण १५,८३६ कामगारांपैकी २,४८६ महिला व १,६२३ कायद्याप्रमाणे वयोमर्यादा पूर्ण केलेल्या मुलांचाही समावेश होता. १९२७ - १९४० या कालावधीमध्ये बडोद्यातील वस्त्रोद्योगामध्ये झालेली प्रगती ही उल्लेखनीय स्वरूपाची आहे. कापड गिरण्यांची संख्या १९२७-२८ मध्ये ११ होती. ती १९३९-४० मध्ये १६ वर पोहोचली. या कापड गिरण्यांमधील कामगारांची संख्या ६,२५० वरून २०,२०० इतकी झाली. म्हणजे जवळपास तिप्पटीहून अधिक झाली. कामगार संख्या, गिरण्यांमधील यंत्रमागांची संख्या, एकूण गुंतवणूक आणि झालेले एकूण उत्पादन या सर्वांमध्येच समप्रमाणात व नियमितपणे वाढ झाल्याचे निदर्शनात येते.
गणदेवी : आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना'

 सुरुवातीला १८७०-७५ पर्यंत बडोद्यामध्ये गूळ बनवण्याच्या प्रक्रियेचे तंत्र ज्ञात होते. मात्र साखर तयार करण्याचे तज्ज्ञांन पुरेसे विकसित झाले नव्हते. यासाठी १८७६ मध्ये पंजाबहून साखर

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १७