पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मराठा जातीच्या उत्कर्षात राष्ट्रीय उत्कर्ष शोधणारे सयाजीराव हे आधुनिक भारतातील पहिले राज्यकर्ते आहेत. कारण महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत सर्वाधिक असणारी आणि शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत जिद्दीने लढलेली ही जात होती. परंतु निसर्गाधिष्ठित शेती करणारा हा समुदाय आर्थिकदृष्ट्या शिवकालापासूनच संकटात होता. अशा परिस्थितीत या जातीच्या उत्कर्षात सामाजिक कल्याणाची बीजे शोधण्याची दृष्टी सयाजीरावांनी दाखवली. स्वतःच्या जातीचा उत्कर्ष हा शूद्र उद्देश सयाजीरावांच्या मराठा उत्कर्षा नव्हता हे त्यांच्या कामाचे खरे 'वैभव' होते.

 मराठ्यांच्या उत्कर्षाचा विचार करणारा हा राजा इतर जातींकडे तितकाच जबाबदारीने लक्ष देत होता. ही बाब भारतातील प्रत्येक राज्यकर्त्याला अनुकरणीय आहे.

महाराजा सयाजीराव आणि डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन

 "विद्ये विना मती गेली...” हे बहुजनास समजावून सांगत महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक चळवळीद्वारे बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसार सुरू केला. याच प्रेरणेने पुढे गंगारामभाऊ म्हस्के व इतर त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन'ची १८८३ साली स्थापना केली. या संस्था स्थापनेमागचा हेतू मराठा जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हा होता. याबाबत गंगारामभाऊ

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ७