पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७) वेळोवेळी निरनिराळ्या खेडेगावी उपदेशक पाठवून शिक्षणाची महती लोकांच्या डोक्यात भरवणे.

 ८) परिषदेचे काम वर्षातून ३६५ दिवस चालेल अशी व्यवस्था करणे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे पहिले अधिवेशन - १९०७

 दोन वर्षे अथक प्रयत्नानंतर मराठा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले; परंतु परिषदेच्या ठिकाणाबाबत मतभेद होते. अखेर ३० डिसेंबर १९०७ रोजी धारवाड येथील सरकारी दरबार हॉलमध्ये पहिली मराठा परिषद भरवण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव महाराज गायकवाड यांनी स्वीकारावे अशी सर्वांची इच्छा होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव विलायतेत असल्यामुळे महाराज या परिषदेला येऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्वानुमते या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासेराव जाधवांची निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्ष भास्करराव जाधव होते. या परिषदेस अप्पासाहेब शिंदे, लक्ष्मणराव इनामदार, श्रीनिवास रोह, एच. सी. फॉक्स, दाजीराव विचारे, रामचंद्रराव गायकवाड इ. व्यक्ती हजर होत्या.

 या परिषदेच्या पहिल्या बैठकीत बोलताना भास्करराव जाधवांनी परिषदेच्या आयोजनातील 'दीनबंधू' पत्रकाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. या भाषणात

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १४