पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षण परिषद व मराठ्यांच्या शिक्षणासंबंधी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात सयाजीराव महाराजांनी उपस्थितांना संबोधित केले. या भाषणात शिक्षणाविषयीचे आपले विचार मांडताना महाराज म्हणतात, “शिक्षणासंबंधाने मला एवढेच सांगायचे आहे की, शिक्षण या शब्दाचा अर्थ करताना फार दूरदर्शीपणा ठेवला पाहिजे. शिक्षण या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. शिक्षणात ज्याप्रमाणे शास्त्र, साहित्य यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे विद्या, हुन्नर, व्यापार यांचाही समावेश झाला पाहिजे. विद्या, हुन्नर व व्यापारधंदा याच तीन गोष्टींवर देशाची आबादानी अवलंबून असते. या तीन गोष्टीच्या साहाय्याने श्रीमंत वर्ग ज्याप्रमाणे शक्तिमान होतो त्याचप्रमाणे गरीब वर्ग शक्तिमान होतो. देशातील प्रत्येक मनुष्य सुशिक्षित झाला नाही तोपर्यंत देशाची अबादानी व्हावयाची नाही, शिक्षणाने सार्थक कसे होते असे म्हटल्यास शिक्षण आणि प्रत्येक मनुष्य स्वतंत्र होतो म्हणून तो स्वाश्रमी होतो. मात्र प्रत्येक व्यक्तीने आपली निराळीच ज्ञाती आहे हे विसरून जाऊन सर्व उन्नतीचे मूळ जे शिक्षण (विद्या) प्रसार यच्चयावत मानव जातीत सर्वांनी करण्याचा प्रयत्न तनमनधनें करून केला पाहिजे.”

 भाषणाच्या शेवटी मराठा शिक्षण परिषदेला शुभेच्छा देताना महाराज म्हणतात, “आपण जी मराठा शिक्षण परिषद भरविण्याबद्दल खटपट करीत आहात, त्यात आपणास पूर्ण यश

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १२