पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

क्षेत्राच्या विकासासाठी संस्थानातील जनतेला साक्षर करतानाच विविध ठिकाणच्या सुधारणांचा चिकित्सक स्वीकार करण्याचे सयाजीरावांचे धोरण शिवाजी महाराजांच्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करणारे आहे.
गनिमी कावा : शिवरायांचा आणि सयाजीरावां
 मराठा बारगिरांनी जन्माचाला घातलेल्या 'गनिमी कावा' युद्ध तंत्राचा निजामशाही साम्राज्याचा सेनापती मलिक अंबरने विकास केला. तर या तंत्राचा उत्तम उपयोग करत शिवाजी महाराजांनी तत्कालीन भारतात 'सर्वात वेगवान' म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्यांचे सैन्य उभे केले. ब्रिटिश शासनाचे गुप्तहेर आयुष्यभर पाळतीवर असताना सयाजीराव महाराज आयुष्यभर त्यांना गुंगारा देत राहिले. आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान सयाजीरावांनी श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, केशवराव देशपांडे इ. क्रांतिकारकांना सातत्याने सक्रिय मदत केली.
 शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारताला स्वराज्याचे स्वप्न पाहायला शिकवले. स्वकर्तृत्वाने स्वतःचे राज्य स्थापन करून सुराज्यासाठीचे स्वराज्य प्रत्यक्षात उतरवले. सयाजीरावसुद्धा वयाच्या १२ व्या वर्षी अपघाताने बडोदा गादीचे वारसदार झाले. राज्याभिषेकावेळी निरक्षर असणाऱ्या सयाजीरावांनी त्यानंतर शिक्षण घेऊन आयुष्यभर ग्रंथ आणि विद्वान यांच्याशी स्वतःला

एकरूप करून लोकप्रशासनाचे नवीन विक्रमच प्रस्थापित केले. स्वतःच्या व्यासंगाने जगातील सर्व प्रतिष्ठित

ज्ञानकेंद्रांचे सन्मान महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टीचे निर्माते / १२