पान:महाभारत.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. १. मुक्तेश्वराची उपलब्ध असलेली पहिली चार पवें प्रसिद्ध झाल्यावर, इतर कवींचीं पर्वे मिळवून, त्यांपैकी चांगली असतील ती निवडून घेऊन प्रसिद्ध करावीं; व अशा प्रकारे तरी निवळ मराठी वाचकांस महाभारतातील विशाल व विविध ज्ञानभांडाराचा आस्वाद घेता यावा, अशी माझे पितृव्य व गुरु ती० कै० वामनरावजी ओक यांची उत्कट इच्छा होती. ह्या आपल्या मनोदयानुरूप त्यांनी गोपाळ, चंद्रात्मज, नरहरि, मैराळ, शंभुदास, मोरेश्वर, माधव इत्यादि महाराष्ट्र कवींचीं पर्वे मिळविली होती. मुक्तेश्वराचे विराटपर्व प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या पुढे नरहरिकृत उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, हीं चार पवें अनुक्रमाने प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु मुक्तेश्वराचे वनपर्व संपूर्ण प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांना स्वर्गलोकीं जावे लागल्यामुळे, त्यांच्या इच्छेप्रमाणे नरहरिकृत चारी पर्वे प्रसिद्ध होऊ शकली नाहींत. त्यांच्या मृत्यूनंतर ज्या गृहस्थांच्या हातीं काव्यसंग्रहा'चे काम देण्यात आले होते, त्यांस शुभानंदकृत उद्योग व भीष्म पर्वे ज्यास्त पसंत पडल्यामुळे, त्यांनी त्यांचे प्रकाशन केले; हे चांगलेच झाले. परंतु बाकीच्या कवींत नरहरि बराच वरच्या दर्जाचा असल्यामुळे, त्याची द्रोण व कर्ण पर्वे, ‘काव्यसंग्रहा'चे माजी संपादक कै० रा० नानासाहेब केळकर यांनी प्रसिद्ध करण्याचे ठरवून त्यांच्या संशोधनाचे काम माझ्याकडे सोपविले. त्यांपैकी 'द्रोणपर्व' यथामति शुद्ध करून अर्थनिर्णायक टीपा वगैरे देऊन आज वाचकांपुढे ठेवीत आहे. २. नरहरीने आपल्या मातापितरांसंबंधाने व स्वतःसंबंधाने थोडी माहिती प्रत्येक पर्वाच्या शेवटीं दिली आहे. तीवरून तो इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हयात होता, असे सिद्ध होते. हा कवि निजामशाहींतील बीड परगण्यांतील वीट ह्या गांवचा देशपांड्या होता व भीमराजस्वामी ह्या नांवाचे रामदासी सांप्रदायांतील साधुपुरुष त्याचे गुरु होते. । ३. ह्या कवीचीं मधलींच चार ह्मणजे उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, पर्वे उपलब्ध आहेत. परंतु त्या पर्वचतुष्टयापूर्वीच्या व पुढच्या पर्वावर नरहरीने मराठी पद्यरचना केली किंवा नाही हे खात्रीलायक सांगता येत नाहीं. नरहरीने उद्योगपर्वाच्या उपोद्घातांत ‘विराटपर्वीचे सुधापान । सेवोनी, लांचावले माझे मन, । उद्योगपर्वीचे ब्रह्मरसायन । इच्छा इच्छी अविलंबे. ॥' (अ० १।१६). असा उल्लेख केला आहे. यावरून विराटपर्व व कदाचित् त्याच्या पूर्वीची पर्देही नरहरीने रचिलीं असावी अशी शंका उत्पन्न होते. पण त्याच्या कर्णपर्वाच्या उपसंहारातील पुढील उल्लेखावरून, त्याने चारच पर्वे रचिली होती, असे निःसंशय दिसून येतेः उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, । चत्वारि पर्दै गुणकरत्ने । नरहरिमुखें सिंहाननें, । प्रकट केलीं श्रवणाय. ॥ (अ० १६-२७ ) ह्या पूर्वोक्त विधानाची असत्यता कोणीं सप्रमाण सिद्ध करून दाखविल्यास,