पान:महाभारत.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ नरहरिकृते [द्रोणपर्व जेवीं सौमित्र इंद्रजितचमू । शिरके तैसा राजसत्तमू । कीं कार्तवीर्यसेने परशरामू । पेटे तेंवीं यदुवर्य. ॥ ७९ ॥ येतां देखोनी सात्यकी वीर । वरवाळले कौरवभार । देखोनी दृष्टी युधिष्ठिर । सेनामेळीं तगटला. ॥ ८० ॥ उभय सेनांची मिळणी । जाणों कृष्णाभीमा एकची दोन्ही । “घ्या, ध्या, शब्द सव वदनीं । अतितुंबळ माजला. ॥ ८१ ॥ सात्यकी लोटतां पुढा । कौरववीरीं घातला वेढा । जाणों लंकेसी समुद्र गाढा । घाली पॅरिखा ज्यापरी. ॥ ८२ ॥ चहूंकडुनी शस्त्रवृष्टी । करिते जाले घोर हटी । सुसाट उतरती । बाणकोटी । प्रळयानळासारिख्या. ॥ ८३ ॥ बाप र्युयुधान धनुर्वाडा । बाण सोडिले धडधडा । शरीराचा वातला सडा । क्षाळिती क्षमा रक्तौघीं. । ८४ ॥ अद्भुत युद्ध, महाराया ! । होते जाहलें तया समया । सात्यकीविक्रमाची चर्या । काळतुल्य मज भासे. ॥ ८५ ॥ शतशः वीर प्रख्यात कीर्ती । भंगोनी रथ पाडिले क्षिती । सुधाकरासमान शांती । वक्रे तळीं रिचवती. ॥ ८६ ॥ पँवाळवर्ण अधरवेली । सुरंग रंग तांबोलमेळीं । वृषभाक्ष राजित कुंडलें कीळी । धुळी मौळे लोळती. ॥ ८७ ॥ शरजाळ भुजा चर्चित गंधीं । बाहुभूषणे मुद्रिका संधी । महाप्रताप अहिमांदी । जाणों खगेंद्रे खंडिल्या. ॥ ८८ ॥ कनकदंड पताका छत्रे । ज्वलितकांति अमित शस्त्रे । खंडविखंड पाहतां नेत्रे । विस्मयातें पाविजे. ॥ ८९ ॥ भूषित गज पर्वतासरी । छिन होवोनी पडले शरीं । अमोल्य वारू विगत समरीं । सहस्रशः आटले. ॥ ९० ॥ प्रवर्ततां महामारी । ढुंद्रावल्या चमूच्या हारी । द्रोण लोटला जैसा हेरी । गर्जानियां सुसाटे. ॥९१॥ फुफाटे सात्यकी अर्णवलोटीं । वेळ द्रोण तया परा लोटी । येरयेरां पडली मिठी । गजेंद्रनक्रासारिखी. ॥ ९२ ॥ सरसावोनी, शरासनीं । शर सज्जोनी काळमानी । भरल्या दिशा आणि अवनी । ठाव गगनीं न समाये. ॥ ९३ ॥ बाणच्छाया पडली विशद । जाणों शैलभाचे पातले वृंद । तेणे दिग्गज पावले खेद ।। गुंडा मुखी कवळिती. ॥ ९४ ।। गुरुवर्य क्रोधऊर्मी । पंच सायक ताडिले वमा । सायकी क्षोभोनी महानेमीं । सप्त नाराच समप. ।। ९५ ।। तेणे द्रोण क्षी १. कार्तवीर्य हा माहिष्मती नगरीचा राजा. ह्यास हजार हात होते म्हणून यास सहस्रार्जुन असेही म्हणतात. याने जमदग्नीस मारून, त्याची धेनु बळजबरीने नेली म्हणून परशुरामाने यास ठार मारिलें-अशी कथा आहे. २. या नांवांच्या नद्या, ३. खंदक. ४. सात्यकी. ५: पृथ्वी ६. चंद्राप्रमाणे. ७. पवळ्याच्या रंगाची, लाल. ८. पळाल्या. ९. सिंह. १०. (समुद्राचा) किनारा, सीमा, ११. टोळांचे,