पान:महाबळेश्वर.djvu/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३९ )



असें सुद्धां वाटत नाहीं. खोऱ्यांंतून धुकें भरून तें जसजसे वर येऊं लागतें तसतसें तें पाहून टेंकडयांच्या शिखरापर्यंत टेकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे कीं काय असें वाटते. धुके जेव्हां दरीतून वर चढूं लागतें तेव्हां कोणी विशाल प्राण्याचें धूड नाचत असून भूतचेष्टा चालल्यासारखे दिसते. ऊन पडून सूर्य वर येऊं लागला ह्मणजे पिंजा-याच्या कापसाप्रमाणें त्या धुडाची असंख्य शकलें होत जाऊन शेवट कांहींच नाहींसे होतें.

 पुढें पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची तर सोयच नाहीं, व घरांत राहण्याचीही सोय नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळींच होत नाहीं. पावसाच्या पाण्यानें आकाशाला मोठमोठाले भोंके पडल्यासारखे आकाश गळत असल्यामुळे छत्री किंवा घोंगडयाची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर मुळींच मनांतसुद्धां येणार नाहीं. बाहेर गेलेंच तर पानाचीं केलेंलीं विरलीं डोंकीवर घेऊन गेलें पाहिजे. ते घेतलें कीं मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखें झाल्यामुळे व चोहीकडून पावसाचा मार लागत असल्या-