Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५ )



यांनीं या पुस्तकांत समावेश केला आहे. पुस्तक लोकाश्रयास पात्र आहे. तो मिळून रा० दीक्षित यांनी केलेल्या श्रमाचें चीज होईल अशी आशा आहे.

पुणें, ता० १८ आक्टोबर, सन १९०२ इ०

गोपाळ कृष्ण गोखले.



---------------
[ चिंतामण गंगाधर भानू बी. ए. प्रोफेसर आणि लाईफ मेंबर, फर्ग्युसन कालेज, पुणें. ]

 सा० न० वि० वि० आपले पुस्तक बरेंच वाचलें, पुस्तक सर्वोपयोगी, व मनोरंजक असें झालें आहे. असल्या माहितीनें भरलेलीं पुस्तकें आपल्या भाषेत फारच थोडीं आहेत. तेव्हां आपलें हें पुस्तक मराठी वाङमयाला भूषण देणारें होणार आहे. आपलें वनस्पतीसंबंधीं पुस्तक केव्हां वाचण्यास मिळेल याची मी वाट पाहत आहे. प्रयत्न फार चांगला आहे. उत्तम सिद्धीस गेला आहे. कळावें, लोभ असावा, हे विनंती.

चिंतामण गंगाधर भानू
---------------