पान:महाबळेश्वर.djvu/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११५ )


तयार होऊन काढणीस येतें. या कोंकण भागाला शेतकीच्या कामास कोणीही विहिरी करून हें शेत काम चालवीत नाहींत.

 नाचणी, वरी, सावा, हीं धान्येंही दोन प्रकारचीं आहेत. ते “ हाळवे ” व “ महान ” असे होत. यांत इतकाच फरक आहे कीं, हाळवे जातीचें धान्य महानपेक्षां पंधरावीस दिवस अगोदर पूर्णत्वास येऊन गरीब शेतकरी लोकांना उपजीविकेस चांगलें उपयोगीं पडते.

 हिंवाळ्यांत भातखाचरांतून गहूं, खपला व सातू हीं पिके करितात. ऊंस असेल तेथें बारा महिने शेतकऱ्यांस शेतांत खपावें लागतें. याप्रमाणें एप्रिल महिना अखेर शेतकरी शेतपिकें काढून घेऊन दुसरीं कामें करण्यास निखालस मोकळा होतो. इतकी मेहनत करूनही येथें पिकणारे धान्य त्यांना चांगलें भरपूर होत नाही. यामुळे शेतकरी लोकांना हरहुन्नर करून पोट भरावें लागतें.

 आतां देशापेक्षां कोंकणी रानाला पावसाची धार सारखी असते ही गोष्ट खरी आहे. परंतु येथेंही शेत-