पान:महाबळेश्वर.djvu/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८१ )करण्यास ओलेपणीं वाटेल तशी वळणारी असल्यामुळे उपयोगी आहे. ही सुमारे २५ फूट लांबीची सारखी जाडी असलेली मिळूंं शकेल. हिच्या हातांत धरण्याच्या काठया काढून लोक बाजारांत विकावयास आणतात. छत्र्याच्या दांडया करण्यास या वेलीचा चांगला उपयोग होण्यासारखा आहे.

 कुसर- ही वेल आहे. या वेलीला चैत्र व वैशाखमासीं फुलें येतात, त्यांत चमेली, मोगरा, निशिगंध वगैरे फुलांच्या वासासारखा सुंदर वास येतो. या वेलीचीं फळे गरीब लोक निर्वाहाकरितां नेतात. सन १८९७ सालचे दुष्काळांत तर हीं फळे खंडोगणतीं काढून घेऊन त्यांवर पुष्कळ लोकांनीं प्राण रक्षण केलें होतें. हीं फळे दिसण्यांत पावटयासारखीं असून फार कडू असतात. म्हणून यांचा कडूपणा काढून मग ती खावींं लागतात. तो काढण्याची रित अशी:- ओलेपणींंच त्यांचेवरची साल काढून तों आधणाच्या पाण्यांत सुमारें ७|८ वेळ शिजवावींं व प्रत्येक वेळीं तें शिजवून राहिलेलें पाणी टाकून द्यावें, ह्मणजे त्यांचा कडूपणा नाहींसा होते. नंतर त्यांत तिखटमीठ वगैरे घालून तीं उसळीं सारखीं खाण्यालायक होतात.