पान:महाबळेश्वर.djvu/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६६ )तिकडेस पाठवितात, येणेंकरून पोरांना लहानपणीं जी रोगराई होण्याची भीति असते ती रहात नाहीं. तसेंच दांत येते वेळेस त्यांस क्लेश कमी होतात, व एकंदरीनें त्यांचें शरीर सुदृढ व पुष्ट होऊन उतार वयांत तें निरोगी व निकोप राहते.

 येथें अति पर्जन्य असल्यामुळे या हवेंत दोषही आहेत. अतिसार, संधिवात, धनुर्वात, गुल्म, प्लीहा रोग, यकृद्रोग, उदर, व शूल इत्यादिकांस येथील हवा फार वाईट आहे. क्षय, रक्तदोष, रक्तशुद्धि या विकारांस मात्र ही हवा चांगली आहे. परंतु जसा एखादा दररोज गांजा ओढणारा, अफू खाणारा, किंवा दारू पिणारा असला ह्मणजे त्यास नित्य अमली पदार्थ सेवन केल्यानें कैफ येत नाहीं तसेंच वरील हवेच्या अंगच्या गुणदोषांचे साधकबाधकपणाचा परिणाम येथील कायमच्या रहिवाश्यांवर विशेष घडत नाही. म्हणजे त्यांचे त्या पासून हित किंवा अहित जितक्या पुरतें तितकेंच होतें. हिंवाळ्यांत व पावसाळ्यांत पाणी तोंडांत घातलें, तर बर्फाचा तुकडा जिभेवर ठेविल्यासारखे जिभेस रवरवरतें, इतकें तें गार असतें; अंग उघडे टाकलें तर काला-