मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ८७ स्वाभिमानी हिंदूंना पाकिस्तानहि मान्य करून भागणार नाहीं व मध्यर्वात अगर प्रांतिक सत्तेत मुसलमानांना पन्नास टक्के जागाह देता येणार नाहींत. म्हणून, जीनांच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या स्वाभिमानास साजेल असा स्वतंत्र मार्गच चोखाळला पाहिजे. सरकारच्या कुशीत शिरून, आपल्या अज्ञानाचे व दारिद्रयाचे रडगाणे गाऊन, जरूर असेल तेव्हां हिंदूंची खुशामत करून व फिरून त्यांच्यावर साफ उलटून, ! मुसलमानांनी गेल्या ८० वर्षांत आपलें स्तोम कसे माजवून ठेविलें हें ऐतिहासिक दृष्ट्या कळल्यानंतर तरी,कोणताहि स्वाभिमानी हिंदु ऐक्य प्रस्थापनेसाठीं मुसलमानांच्या मागे लागणार नाहीं ! स्वराज्य हा हिंदूंचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळविल्याशिवाय त्यांना गत्यंतरच नाहीं ! पण, मुसलमानांच्या नादी लागून ते मिळेल हा शुद्ध भ्रम आहे ! स्वराज्यप्राप्तीचे मार्ग अन्य आहेत. Hindu-Muslim unity may be the result of Swaraj; it can never be the cause of it (स्वराज्यप्राप्तीचा परिणाम म्हणून हिंदू-मुस्लीम ऐक्य साध्य होईल हे शक्य आहे; हे ऐक्य स्वराज्यप्राप्तीचे कारण मात्र असू शकणार नाहीं) हे हुतात्मा स्वामी श्रद्धानंदजींचे उद्गार शब्दशः खरे आहेत. हे लक्षांत ठेवून, हिंदूनी स्वराज्यप्राप्तीचा आपला स्वतंत्र मार्ग शोधून काढला पाहिजे. । ब्लॉकचें अगर डिझाइनचे कोणतेही काम आपणांस जलद गतीने पाहिजे असल्यास के. सी. भिडे ब्लाकमेकर यांच्याकडे चौकशी करा. मोठ्या गांवीं एजंट नेमणे आहेत. हुजूरपागा चौक, किताब बिल्डिंगसमोर. लक्ष्मी रोड, पुणे,
पान:महमद पैगंबर.djvu/98
Appearance