पान:महमद पैगंबर.djvu/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ पाकिस्तानचे संकट भाषणांत सांगतात : The Hindu community must produce B Tilak. (हिंदुसमाजांत फिरून टिळक अवतीर्ण झाले पाहिजेत ! ) जातीय निर्णयाचे स्वरूप इतके घातकी असूनहि काँग्रेसने त्याचा निषेध करण्याच्या बाबतींत अळंदळे चालविली ! १९३६ सालच्या निवडणुकींची वेळ आली ! १९३४ सालच्या मध्यर्वात अॅसेंब्लीच्या निवडणुकीत जातीय निर्णयाला महत्त्व आल्यामुळे, बंगालमध्ये काँग्रेसला चांगलीच चपराक बसली होती ! त्यामुळे, १९३६च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यांत काँग्रेसने जातीय निर्णयाला खूप नांवें ठेविलीं; पण, त्या निर्णयाच्या विरुद्ध कांहीं चळवळविळवळ मात्र करावयाची नाही, असे ठरविलें ! याचे कारण असे सांगण्यांत आलें कीं, निवडणुकीत विजय मिळाल्यावर काँग्रेस घटनाभंग करणार असल्यामुळे, सगळ्या घटनेच्या भंगाबरोबरच तिचा अवयव जो जातिनिर्णय त्याचाहि भंग होऊन जाईल ! पुढे घटना तर भंगलीच नाहीं; पण, राजीनामे देऊन काँग्रेसच्या मंत्र्यांना ऐन वेळीं अधिकारत्याग करावा लागल्यामुळे, देशांतील शांतता मात्र चांगलीच भंगली ! हिंदु प्रांतांतली लोकसत्ता लुली पडल्यावर, मध्यवर्ती कारभारावर त्या सत्तेचे पडणारें वजन ढिलें झालें ! मुसलमानप्रधान प्रांतांतली लोकसत्ता नांदती राहिल्यामुळे व त्या सत्तेने ब्रिटिश सरकारशीं युद्धसहकार्य करण्याचे धोरण आंखल्यामुळे, त्या सत्तेचे स्तोम माजलें ! सरकार व काँग्रेस या दोन्हींच्याहि दरबारांत आपली इभ्रत भलतीच वाढवून बसलेल्या जीनांना यामुळे चांगलेच फावलें ! पूर्वीपासून जीना व त्यांची लीग फेडरेशनला विरोध करीत होती, त्याचे कारण एकच होते. त्यांना प्रांतांवरील मध्यवति सरकारची सत्ता नको होती किंवा ती राहणारच असेल तर ती नाममात्र असावी, असे त्यांना वाटत होते. प्रांत हे स्वतंत्र सार्वभौम घटक असावे अशी त्यांची पूर्वीपासून मागणी होती. या मागणीचे रूपांतर होऊनच 'पाकिस्तान'ची मागणी धाष्ट्र्याने पुढे मांडण्यांत आली! 'पाकिस्तान मिळणार नाहीं हें मुसलमानांनाहि पक्के ठाऊक आहे; त्यांना हिंदूचे अधिराज्य नको आहे; व म्हणून वरिष्ठ सत्तेमधील निम्मेनिम वाटणी पदरात पाडून घेण्याच्या हेतूने त्यांनीं 'पाकिस्तान 'चे पिशाच्च उठविले आहे' असे कित्येक मनकवडे म्हणतात ! . . । ..