पान:महमद पैगंबर.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ पाकिस्तानचे संकट पर्यंत सैन्यांतल्या अधिकारांच्या जागांबद्दल कांहीं एक विशेष कटाक्ष होता. अगदी अल्पिष्टन साहेबापासूनचे उदार इंग्रज मुत्सद्दी पाहिले तरी, त्यांचे सारें औदार्य मुलकी कारभारांत हिंदी लोकांना समाविष्ट करण्यापुरतेच मर्यादित असे. तेवढ्या क्षेत्रांतसुद्धां जरा जबाबदारीच्या जागी हिंदी माणूस येणार असे दिसू लागतांच, लब्धप्रतिष्ठित इंग्रजांच्या पोटांत मळमळू लागेच! State Secrets म्हणजे राजनीतींतलीं गुह्ये व गुपिते हिंदी माणसांना कळू द्यावयाचीं--हिंदी लोकांना इतकें विश्वासार्ह मानावयाचे हे त्यांच्यापैकीं कित्येकांना असह्य वाटे ! लष्करांतल्या महत्त्वाच्या जागेवर हिंदी माणसाला घ्यावा हे तर त्यांच्या स्वप्नांतहि येत नसे. ही पूर्वपीठिका पाहिली म्हणजे, ऑगस्ट १९१७ च्या दोन्ही घोषणा टिळकांसारख्या ' असंतोषः श्रियो मूलम्' असे मानणाच्या जहाल पुढा-यालाहि स्वागतार्ह कां वाटल्या, हे लक्षांत येईल. “जबाबदारीची राज्यपद्धति' या शब्दप्रयोगाच्या शिडीने आपण लोकशाही पद्धतीच्या पार्लमेंटरी कारभारापर्यंत जाऊन भिडू असा विश्वास त्यांनी बाळगिला. मोर्लेसारखा उदार म्हणून प्रसिद्ध असलेला मुत्सद्दीहि ८-१० वर्षांपूर्वी पार्लमेंटरी राज्यपद्धतीचे नांव काढावयाला तयार नव्हता; आज स्वतः राजेसाहेब जबाबदारीच्या स्वराज्याची भाषा--शेवटचे ध्येय म्हणून कां होईना--काढू लागले, हेच टिळकांना विशेष कां वाटले हे नीटपणीं समजण्यासाठी, १८६१ पासूनचा सुधारणांचा इतिहास तपासला पाहिजे. हिंदुस्थानांत जाऊन भारतमंत्र्यांनी समक्ष सगळ्या गोष्टी तपासाव्या असे ठरून, माँटेग्युसाहेब हिंदुस्थानांत आले. जबाबदारीच्या स्वराज्याच्या ध्येयाची घोषणा झाली, कांहीं सत्ता हातीं पडण्याची लक्षणे दिसू लागली, त्याबरोबर जो तो वर्ग आपल्या महत्त्वाचे तुणतुणे गाऊ लागला. आपल्यामागे कोणता तरी वाघ लागला आहे व म्हणून आपल्याला ब्रिटिश सत्तेचे संरक्षण पाहिजे आहे असे म्हणणा-या संस्था, जुनाट घरांत कोळिष्टके वाढतात तशी, वाढू लागल्या. संयुक्त प्रांतांतल्या मुसलमानांनी आपली 'डिफेन्स अॅसोसिएशन' काढली; मद्रासेंत ' जस्टिस पक्ष' जोराने हालचाल करू लागला; मुंबई इलाख्यांत 'ब्राह्मणेतर' या विचित्र नांवाचा पक्ष निर्माण झाला; गेल्या १०-१५ वर्षांत वाढू लागलेला गिरणीकामगारांचा वर्ग संघटितपणे बोलू लागला; पूर्वास्पृष्टांचीं गान्हाणी चव्हाट्या