पान:महमद पैगंबर.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोटी कल्पना व तिचे खंडण २१ पतनंतरच्या काळांत ज्या अहंदु सत्ता भरतखंडभर बोकाळत गेल्या त्या सर्वांना तोंड देण्याचे काम मराठ्यांना प्रायः एकाकीच करावे लागल्यामुळे, या अफाट कामाच्या मानाने ते अपुरे पडले. सत्तासंपादनाच्या व सत्तारक्षणाच्या कामीं जो अनुभव नेहमीच सर्वत्र येतो तो याहि प्रकरणी आल्यामुळे, शेवटीं मराठे व शीख यांचा मोड झाला व भारतांतल्या साम्राज्यसत्तेपर्यंत इंग्रजांचे हात पोंचले. जो जास्त जागरूक, तो जास्त हिकमती, ज्याचे शस्त्र पल्लेदार व ज्याचे शास्त्र अद्ययावत् तो सर्वश्रेष्ठ सत्ताधारी वनावयाचा हा । स्वयंसिद्ध नियम आहे. चलानामचला भक्ष्या: दंष्ट्रणामप्यदंष्ट्रकाः । सहस्तानां अहस्ताश्च शूराणां चैव भीरवः ।। या जुन्या श्लोकांत ग्रथित केलेल्या अनुभवाचे देशकालानुरूप जे परिणत स्वरूप होणे शक्य होते ते झाल्यामुळेच, इंग्रज या देशांत सत्ताधीश बनले. या सर्व गोष्टी वास्तविक अशाच असल्या तरी, आमच्यापूर्वी साम्राज्यसत्ता मोगलांची होती' ही इतिहासविरुद्ध कल्पना पिकविण्याचे इंग्रजांना कारण नाहीं; स्वार्थाध राज्यकर्त्यांनीं पिकविलेल्या या कल्पनेवर मुसलमानांनी भाळून जाण्याचे कारण नाहीं; आणि, असल्या कुत्सित पण सोइस्कर कल्पनांमुळे चढून गेलेले मुसलमान देशाचे अखंडत्व खंडित करू पाहात असतील तर, त्यांच्या त्या दुराग्रहापुढे इतरांनी दबून जाण्याचे तर कांहींच कारण नाहीं! | " दीर्घकाळपर्यंत हिंदुस्थानांत साम्राज्यसत्ता उपभोगणारे आम्ही मुसलमान; कांहीं झालें तरी हिंदूंचा पगडा आम्ही मान्य करणार नाहीं; पुढच्या सगळ्या कटकटी टळाव्या असे हिंदूंना व ब्रिटिशांना वाटत असेल तर त्यांनी ब-या बोलाने आम्ही मागत असलेला सवता सुभा मान्य करावा,' या मागणीच्या पोटांत दडून वसलेली भावना किती खोटी व इतिहासविसंगत आहे हे बुद्धीला पटण्याच्या दृष्टीने आतापर्यंत केलेले ऐतिहासिक घटनांचे धांवतें परीक्षण पुरेसे आहे. ही मागणी निराधार व अनैतिहासिक असूनहि मुसलमान ती तशीच दामटीत आहेत यालाहि एक कारण आहे. आचरटपणाच्या कांहींहि मागण्या मागत राहिल्याने वाजवीपेक्षां ब-याच अधिक गोष्टी पदरांत