पान:महमद पैगंबर.djvu/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ पाकिस्तानचे संकट ही ऐपत येईपर्यंत, समाजांतल्या दलितांबद्दल व दुःखितांबद्दल मायेचे शब्द तरी बोलू लागण्याची संवय हिंदुसंघटनवाद्यांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे. कारण ‘जिवाच्या अखिल रोगांना,उतारा एक मायेचा' हा कवीने मांडलेला सिद्धांत शब्दशः खरा आहे. तीस कोटी समाजांतल्या दलितांबद्दल व दुःखितांबद्दल ममता उत्पन्न होणे ही गोष्ट मन मोठे झाल्याशिवाय साधण्यासारखी नाहीं. आणि, आज भोंवताली घडणा-या अनेक घटनांकडे पाहिले तर, दुर्दैवाने हे मान्य करावे लागते कीं, मोठ्या मनाचीं माणसे समाजांत फार थोडी आहेत. अशा मोठ्या मनाच्या माणसांची वाण असल्यामुळेच, समाजांत नाहीं नाहीं ते संघर्ष उद्भवतात व वाढीस लागतात. ज्या प्रश्नावर महाराष्ट्राचे सारे समाजकारण आणि राजकारण एकसारखें आदळत व आपटत असतें तो ब्राह्मणेतरांचाच प्रश्न घ्या. समाजांत मोठ्या मनाचीं पुरेशी माणसे असतील तर, ब्राह्मणेतरांचा प्रश्न चिघळण्याचे कांहींच कारण नाहीं. ब्राह्मणेतरांचा प्रश्न म्हणजेच महाराष्ट्रांतल्या कोट्यवधि लोकांचा प्रश्न. ब्राह्मणेतर स्वतंत्रपणे बोलू लागले, स्वतंत्र जागृति दर्शवू लागले, स्वतंत्र महत्त्वाकांक्षा बाळगू लागले, स्वतंत्र ध्येये ठरवू लागले यांत भिण्यासारखे काय आहे ? आणि याबद्दल भीति बाळगावयाची कोणी तर ब्राह्मणांनीं ! ‘ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः । असा आशीर्वादात्मक घोष समाजांतून उठत राहावा आणि निर्भयवृत्तीने नांदणे ब्राह्मणांना शक्य व्हावे, हे हिदुसमाजाच्या ख-या आरोग्याचे लक्षण आहे. पण आज विपरीत प्रकार असा दिसतो कीं, ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांची भीति वाटते ! याही पेक्षा विपरीत प्रकार असा की, ब्राह्मणेतरांना ब्राह्मणांचे भय वाटते. ब्राह्मण आपल्याला फसवितात, ब्राह्मण आपल्याला टांग मारतात, ब्राह्मण स्वतःच्याच पोळीवर तूप ओढून घेतात अशी भावना ब्राह्मणेतर समाजांत निर्माण झाली व वाढली की, ब्राह्मणांनींच दृष्टि अंतर्मुख केली पाहिजे व आपल्या पायाशीं खरोखरच कांहीं जळत आहे की काय, याचा तपास त्यांनी केला पाहिजे. नुसता जन्माने नव्हे तर वृत्तीनेंहि जो ब्राह्मण असेल' तो ब्राह्मणेतरांच्या संघटनेचे आणि ब्राह्मणेतरांमधील जागृतीचे मोकळयां 6 , ::